हॉकीमध्ये भारताला विजय आवश्यक

hokey

हेगः वर्ल्डकप हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारताला बेल्जियमकडून पराभव स्वीाकारावा लागला आहे. बेल्जियमने भारताला अगदी अखेरच्या क्षणाला केलेल्या गोलच्या जोरावर हरविल्यामुळे भारताचे गुणांचे खाते उघडलेले नाही. त्यामुळे आता गुणाचे खाते उघडण्यासाठी भारताला इंग्लंडविरूध्द विजय आवश्यणक आहे.

वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत इंग्लंडशी भारताचा मुकाबला असून भारत या सामन्यात दिल्लीतील पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल. यंदाच्या मोसमात सुरूवातीलाच इंग्लंडने वर्ल्ड लीग हॉकी स्पर्धेत भारताला २-० असे हरवले होते. जॅक्सन भारतातील हॉकी लीग स्पर्धेतही खेळला असल्यामुळे त्याला भारतीय डावपेचांची महत्वाेची आहे.इंग्लंडचा भर असतो भक्कम बचावावर अन आक्रमणासाठी इंग्लंडचा लौकिक नाही परंतु प्रतिस्पर्ध्यांच्या बचावातील त्रुटींचा फायदा उठवण्यात इंग्लंड संघ मशहूर आहे अन नेमका याच्यावरच रविवारी भारतीय संघाने सरावादरम्यान भर दिला.

प्रशिक्षक टेरी वॉल्श आणि ऑल्टसमन यांनी गेले ६ महिने या बाबींवरच भर दिला आहे पण प्रत्यक्ष सामन्यात खेळताना भारतीय बचावफळीच्या उणीवा दिसून येतच आहेत. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टेरी वॉल्श यांची भारताच्या अपेशी सलामीमुळे निराशा झाली पण त्यांना अपेक्षा आहे की इंग्लंडविरूध्द सामन्यात भारतीय संघ त्याच चुका पुन्हा करणार नाही. इंग्लंड हा तुल्यबळ संघ असून त्यांच्याकडून कडवी झुंज अपेक्षित असल्याचे वॉल्श यांनी सांगितले.

Leave a Comment