मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा सेनेकडून दावा

sanjay
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा न पाहताच सेना -भाजपमध्ये आतापासूनच ‘हिशोब’ सुरु झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सेनेकडून जोरदार ‘टाहो’ फोडला जात असला तरी भाजपने त्यांची समीकरणे गुलदस्त्यात ठेवली आहे;पण मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकल्याने अस्वस्थ सेनेने आमचाच मुख्यमंत्री हा रेटा कायम ठेवला आहे,त्यात भरीस भर म्हणून शिवसेनानेते संजय खासदार यांनी मुख्यमंत्री सेनेचाच होणार असा दावा केला आहे.

महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण यावरुन जोरदार वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर जाहीर होईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत असताना शिवसेना नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी सुरू केली आहे.महायुतीची सत्ता आल्यास शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा शिवसेना नेता संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली.मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे स्पष्टीकरण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment