पोस्टपेड ग्राहकांसाठी आयडियाची भाडेवाढ

idea
आयडिया सेल्युलर या टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपनीने आपल्या पोस्ट पेड ग्राहकांसाठी मासिक भाड्यात ५० रू. वाढ केली असून ही वाढ जूनपासून लागू होत आहे.

आयडियाचे मुंबई सर्कलचे सेवा प्रमुख अमित दिमरी या विषयी माहिती देताना म्हणाले की आमच्या सर्व पोस्ट पेड ग्राहकांना मासिक भाडेवाढीची कल्पना ईमेल करून दिली गेली आहे. मार्च २०१४ अखेरी आयडियाची ग्राहक संख्या १३.७९ कोटी इतकी होती त्यात पोस्ट पेड ग्राहकांचे प्रमाण ४ टक्के आहे. ही भाडेवाढ देशातील आयडियाच्या सर्व सर्कलसाठी आहे की फकत मुंबई सर्कलसाठी आहे याचा खुलासा केला गेलेला नाही.

Leave a Comment