राज ठाकरे कोणत्या मतदारसंघाची निवड करणार ?

raj2
मुंबई – ठाकरे घराण्यातून प्रथमच राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने ते कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून तर्क-वितर्काना उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे मनसेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. आणि आता विधानसभेची तयारीही सुरु करण्यात आली आहे. त्यात राज ठाकरे नेमके कोठून निवडणूक लढतात याची चाचपणी सुरु झाली आहे. त्यात राज ठाकरे दादरमध्ये राहतात ,तो विभाग माहिम मतदारसंघात येतो.

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आमदार नितीन सरदेसाई करत आहेत. विशेष म्हणजे माहिम मतदारसंघावर नितीन सरदेसाई यांची चांगली पकड आहे. यामुळे नितीन सरदेसाईं ऐवजी राज ठाकरे येथून उभे राहतील आणि नितीन सरदेसाई यांना पक्षात आणखी मोठे स्थान मिळेल अशी चर्चा आहे. तसेच बाळा नांदगावकरांच्या शिवडी मतदारसंघाचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढवू शकतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment