मलेशियात किशोरीवर ३८ जणांकडून गँगरेप

smalaysia
क्वालालंपूर – मलेशियात एका १५ वर्षीय किशोरीवर ३८ जणांकडून गँगरेप झाल्याची लाजीरवाणी घटना घडली असून त्यातील १३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

मे महिन्याच्या अखेरीस घडलेली ही घटना नुकतीच उजेडात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मुलीची मैत्रीण तिच्यासोबत होती आणि या मैत्रिणीने तिला एका रिकाम्या झोपडीत नेले होते. ही झोपडी म्हणजे स्थनिक नशेबाजांचा अड्डा असून येथे या मुलीवर ३८ जणांनी सामुहिक बलात्कार केला. मलेशियात बलात्काराच्या घटनांत दिवसेनदिवस वाढ होत चालली असताना घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद देशात उमटले आहेत. स्थानिक नागरिकांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असताना पोलिस आणि प्रशासनाने मात्र चुप्पी साधली आहे.

मलेशियात बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास ३० वर्षे तुरूंगवास आणि फटके मारण्याची शिक्षा अशी कायद्यात तरतूद आहे.

Leave a Comment