नायजेरियातील बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू

nigeria
मुबी – उत्तरपूर्व नायजेरियातील मुबी शहरात एका बारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. या बारमध्ये फुटबॉल सामन्याचे प्रक्षेपण सुरु असताना, स्फोट झाला. रविवारी संध्याकाळी बारमध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी गर्दी झालेली असताना, हा स्फोट झाला.

बोको हरामने हा हल्ला केल्याचा संशय आहे. बोको हरामने यापूर्वीही या भागात हल्ले केले आहेत.याच संघटनेने १४ एप्रिलला नायजेरियामधून २०० हून अधिक शाळकरी विद्यार्थिनींचे अपहरण केले होते. अजूनही बोको हरमने याच्या संघटनेने या मुलींना ओलीस ठेवले आहे. गेल्या आठवडयात जॉसमध्ये एका फुटबॉल सामन्या दरम्यान आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला होता. लक्ष्यापर्यंत पोहोचण्याआधीच कारचा स्फोट झाल्याने मोठया प्रमाणात जिवीतहानी टळली. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता.काही वृत्तसंस्थांनी ४० हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनेने अद्यापपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र बोको हरामने हा हल्ला केल्याचा संशय आहे.

Leave a Comment