ताशी ८०० किलोमीटर वेगाने उडणार कार

gf
मुंबई दिल्ली अंतर दोन तासापेक्षा कमी वेगात कापू शकेल इतक्या म्हणजे ताशी ८०० किमी वेगाने ३८ हजार फुटांवरून हवेत उडणारी कार आता कांही वर्षातच प्रत्यक्षात अवतरणार आहे. जीएफ ७ नावाची ही कार एअरबॉस एरोस्पेस या कॅलिफोर्नियातील डिझायनिंग इंजिनिअर फर्म मध्ये कार्यरत असलेल्या ग्रेग ब्राऊन आणि डेव फासेट यांनी तयार केली आहे. चार प्रवासी या कारमधून प्रवास करू शकणार आहेत.

दूर अंतरावरचा प्रवास सुलभतेने आणि वाहतूक कोंडीत न अडकता या कारमुळे होऊ शकणार आहे. या कारला जेट इंजिन बसविले गेले आहे. आणि आकाशातून खाली उतरताना हायवेचाच उपयोग रनवे सारखा करून ही कार जमिनीवर आणता येणार आहे. अर्थात हायवेवरही ही कार धावणार आहे मात्र तिचा वेग असेल ताशी १६० किमी आणि हवेतून उडताना मात्र हा वेग ८०० किमी असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

जेव्हा रस्त्यावरून ही कार न्यायची असेल तेव्हा इलेक्ट्रीक इंजिनचा वापर करून जेट इंधन वाचविता येणार आहे. गरज असेल तेव्हा टरबाईन इंजिन सुरू करून हवेत झेप घेता येणार आहे. चार वर्षात ही कार बाजारात उतरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही समजते.

Leave a Comment