जगातील सर्वाधिक उंचीची केबल कार

बोलिव्हीया- जगातील सर्वाधिक उंचीवरून चालणारी म्हणजे ४ हजार फुटांवरून जाणारी पहिली केबलकार बोलिव्हीयाचे राष्ट्रपती इवो मोरालिस यांनी हिरवा बावटा दाखविल्यानंतर सुरू झाली असल्याचे वृत्त आहे. लापाज व अल अल्टो या दोन शहरांदरम्यान जाणारी ही केबलकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

या केबलकारमुळे या दोन शहरादरम्यान ४,४००० प्रवासी अत्यंत कमी वेळात प्रवास करू शकणार आहेत. ऑस्ट्रीयातील डोप्पलेमायर कंपनीने ही केबलकार बांधली असून त्यासाठी २३.५० कोटी डॉलर्स खर्च आला आहे. तीन लाईनवरून ही केबलकार जाणार आहे आणि ११ स्टेशनवर थांबणार आहे. सध्या १ लाईन सुरू असून दोन्ही बाजूंचे नेटवर्क सुरू झाल्यानंतर तासाला ३ हजार प्रवासींची यातून ने आण होऊ शकणार आहे.

Leave a Comment