काश्मीर मुद्दा ; पाक मूळ भूमिकेवरच कायम

kashmir
इस्लामाबाद – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारतात आले,परिणामी काश्मीर मुद्दयावरून सकारात्मक तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला ;पण त्यालाच पाककडून हरताळ फासण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार काश्मीरचा मुद्दा सोडवावा असा पवित्रा घेवून मूळ भूमिकेशी ते ठाम राहिले आहेत.

पाकिस्तानी पार्लमेंटमधील पहिल्याच भाषणामध्ये काश्मीरचा मुद्दा तेथील जनतेची इच्छा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार सोडविण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याची भूमिका पाकिस्तानचे अध्यक्ष मामनून हुसेन यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्यातून दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यावर नेहमीप्रमाणे पाणी फिरले आहे . पाकिस्तानी पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनामध्ये मामनून वरील भूमिका मांडली. त्यामुळे काश्मीरसंबंधात पाकिस्तान आपल्या पूर्वीच्याच मुद्द्यावर कायम असल्याचे स्पष्ट झाले

Leave a Comment