पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार

ipl

बंगळुरू – सातव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतापदासाठी पंजाबचे किंग्ज आणि कोलकात्याचे रायडर्स यांच्यात रविवारी महायुद्ध रंगणार आहे. यापूर्वी कोलकत्ता संघाने २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती, तर पंजाबने पहिल्यांदाच या स्पपर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या दोन टीममध्ये किताबासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.या अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंजाबने क्वालिफायर-२ मध्ये दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. तसेच क्वालिफायर-१ च्या सामन्यात कोलकात्याने पंजाबचा पराभव करून फायनलमधील प्रवेश निश्चित केला होता. आता पंजाबला या सामन्यातील पराभवाची परतफेड करून किताब जिंकण्याची संधी आहे त्यामुळे या सामन्यानत पंजाबचा संघ कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात मॅक्संवेल, विरेंद्र सेहवाग व कर्णधार बेली यांच्याे कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघाने आतापर्यंत कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली समाधानकारक कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील लीग सामन्यात त्यांनी सर्वच संघाचा पराभव करताना सलग सात विजय मिळवले आहेत. दरम्यान, सुमार कामगिरी व निराशाजनक सुरुवातीचा टीमला मोठा फटका बसला होता. मात्र, त्यानंतर केकेआरने पुनरागमन केले. त्यावमुळे पंजाबविरूध्दच्या अंतिम सामन्यात त्यांची चांगली कामगिरी झाल्यााने त्यांपचा या स्पर्धेत कसा परफार्मन्से राहणार याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment