मुंबई – खाजगी एफएम रेडिओ केंद्रांना बातम्या प्रसारित करण्याची अनुमती नाही, ती लवकरच दिली जाईल असे आश्वासन माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिले. या रेडिओ केंद्रांना बातम्या प्रसारित करण्यास का बंदी घातली आहे हेच समजत नाही, असे ते म्हणाले.
एफएम रेडिओला बातम्यांची अनुमती
एफएम रेडिओ केंद्रांमुळे सरकारला चांगले उत्पन्न मिळत आहे आणि देशामध्ये खाजगी रेडिओ स्टेशन चालवणार्या २४ संस्था कार्यरत आहेत. यातली बहुतेक रेडिओ केंद्रे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या मालकीचेच आहेत असे ते म्हणाले.
वृत्तपत्रे आणि माध्यमांमध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणूक मंजूर करण्याच्या कल्पनेवर आपण विचार करत आहोत आणि त्या संबंधात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून माहिती मागवली जात आहे असेही ते म्हणाले.