पंढरपूर – आमच्यात कमतरता आहे ,हे लोकांनी मतदानामधून दाखवले आहे.लोकसभा निवडणुकीत जनतेन दिलेल्या निकालामधून आम्ही शिकले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोला येथे कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले , देशातील जनतेने भाजपच्या बाजूने का होईना पण स्पष्ट बहुमत दिल्याने देशात स्थिर सरकार स्थापन झाले आहे.
पराभव … आमच्या कमतरता ,पवारांची कबुली
भाजप आणि काँग्रेसमध्ये जनतेने भाजपला पसंती दिली तर जिथे या दोघांपेक्षा सक्षम पर्याय आहे ,तिथे प्रादेशिक पक्षांना मतदान झाले असेही पवार यांनी यावेळी नमूद केले. तसेच देशात स्थिर सरकार आले ही एक चांगली गोष्ट असल्याचे स्पष्ट करताना जनतेच्या शहाणपणाचा हा निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची बाजूही पवारांनी घेतली. ते म्हणाले ,मिडीयातून आरोप करत प्रसिद्धी मिळवायची सध्या फॅशन झाली आहे , कामावरून व्यक्तीची पात्रता तपासावी उगाच आरोप करू नये. अशा पद्धतीने प्रतिमा मलिन करणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट करताना त्यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेवरच टीका केली.