सौदी अरेबियामध्ये भारतीय आंब्यांचेच आकर्षण

mango
एकीकडे भारतीय हापूस आंब्यांवर युरोपियन राष्ट्र संघाने बंदी घातलेली असताना ,सौदी अरेबियामध्ये आंबा महोत्सवात मात्र भारतीय आंब्यांना पसंती दिली जात आहेत. विविध जातींचे आंबे सध्या आकर्षण ठरत आहेत.

सौदी अरेबियामध्ये सध्या आंबा प्रदर्शन सुरू असून भारतातील जवळपास १० प्रजातींचे आंबे या महोत्सवात मांडण्यात आले आहेत. त्यात जगभरातील विविध जातींचे आंबे येथे मांडण्यात आले आहेत. गेल्या आठवडय़ात सुरू झालेला हा महोत्सव आंबा खवय्यांसाठी २८ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

सौदी अरेबिया हा देश आंबा आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. विशेषत: भारत आणि पाकिस्तानमधील आंब्यांना येथे मोठय़ा प्रमाणात मागणी असते. कर्नाटकमधील मांद्या जिल्ह्यातील आंबे या प्रदर्शनात पाहावयास मिळत आहेत. भारतातील हापूस, केसर, तोत्तापुरी, बदामी आणि राजापुरी या आंब्यांच्या विशेष जाती महोत्सवाचे आकर्षण ठरत आहेत. जवळपास सर्वच आंबा उत्पादक देशांमधून विविध जातींच्या आंब्यांचा ताजा साठा या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment