जगातल्या सर्वात वजनदार व्यक्तीचे निधन

urbe
मॉंटेरी – एकेकाळी जगातला सर्वात वजनदार माणूस म्हणून ख्याती पावलेल्या मेक्सिकोतील मॅन्युअल उरीबे याचा काल मृत्यू झाला. तो ४८ वर्षांचा होता त्याचे वजन ५९७ किलो भरले होते आणि तो जगातला सर्वात वजनदार माणूस ठरला होता.

मॉंटेरीच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. हृदयाचे ठोके अनियमित होते आणि पायाकडील भागातले विविध द्रव पदार्थ कमी होते, या विकारांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

२००७ साली ५९७ किलो वजन नोंदवून त्याचे नाव गिनेज बुकात समाविष्ट झाले होते. त्याच वर्षी त्याने वजन घटविण्यास सुरुवात केली. काही महिन्यात वजन ३९४ किलोवर आले. २००८ साली त्याचा विवाहही झाला.

गेल्या २ मे रोजी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला चालता येत नसल्यामुळे क्रेनवरून न्यावे लागले व रुग्णालयात दाखल करावे लागले, पण तिथे उपचार सुरू असतानाच तो मरण पावला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment