चेन्नईच्या विजयात मॅक्सवेलचा अडथळा

maxwell

चेन्नई- आयपीएल स्पर्धेत आतापर्यंतच्या सामन्यापत चेन्नई सुपर किंग्ज व किंग़ज इलेव्हन पंजाब संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्या कामगिरीच्या जोरावरच आतापर्यंत दोन्ही् संघाने विजयी घौडदौड सुरु ठेवली आहे. शुक्रवारी आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये चेन्न ई आणि पंजाबमध्ये लढत होणार आहे. या सामन्यात चेन्नीईच्या विजयात पंजाबचा दमदार फलंदाज मॅक्‍सवेलचा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अनपेक्षितपणे राजस्थान रॉयल्सला हरवून ‘प्ले-ऑफ’मध्ये आपले स्थान पक्के केले. तर बुधवारी दोन धक्कादायक निकालांची नोंद झाली. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सने चक्क गुणतालिकेतील ‘अव्वल नंबरी’ किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली, तर ब्रेबॉर्न स्टेडियवर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ‘खेळ खल्लास’ केला. आता शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील लढतीद्वारे रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणा;या अंतिम फेरीसाठी कोलकाता नाइट रायडर्सचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे.

आयपीएलच्या गेल्यार सहा हंगामांकडे नजर टाकल्यास २००९ मध्ये द. आफ्रिकेत झालेला दुसरा हंगाम वगळता प्रत्येक वर्षी चेन्नई सुपर किंग्ज विजेता किंवा उपविजेता ठरला आहे. त्यामुळे ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची वाटचाल रोखणे ही कठीण गोष्ट आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने २००८च्या पहिल्या हंगामात तिसरे स्थान पटकावले होते, परंतु हा अपवाद वगळल्यास त्यानंतरच्या प्रत्येक हंगामात हा संघ विजयासाठी झगडतानाच आढळला आहे. पण यंदा ग्लेन मॅक्सवेलने कमाल केली आहे. त्याने प्रतिस्पर्धी संघ, देशोदेशीचे गोलंदाज यांच्यापैकी कुणाचीही तमा न बाळगता आक्रमणाचे हत्यार उपसले. त्यामुळे १४ सामन्यांपैकी ११ जिंकत २२ गुणांसह पंजाबने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. यंदाच्या आयपीएलमध्ये अबू धाबी आणि कटक या दोन्ही ठिकाणी पंजाबने चेन्नईला हरवण्याचे कर्तृत्व दाखवले आहे. या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय फलंदाज मॅक्सवेलने ९०पेक्षा अधिक धावा काढण्याची किमया साधली होती. या पाश्र्वभूमीवर चेन्नईला सर्वाधिक धोका हा मॅक्सवेलपासून आहे. परंतु आयपीएलच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर पंजाबकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी चेन्नईला मिळणार आहे.

Leave a Comment