एलबीटीविरोधातील पुन्हा ‘एल्गार ‘

lbt
मुंबई – राज्यात व्यवसाय करणे अशक्य झाले असून सरकारने तातडीने एलबीटी रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली असून एलबीटीविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्णय राज्यातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे . येत्या ७ जून रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत एलबीटीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाप्रत हे व्यापारी पोहचण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

एलबीटी रद्द करण्याच्या मागणी करण्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबर्इ व मीरा भार्इंदर येथील व्यापारी संघटनांतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी या कराच्या ओझ्यामुळे राज्यात व्यवसाय करणे अशक्य झाले असून सरकारने तातडीने एलबीटी रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांचे प्रमुख मोहन गुरनानी यांनी केली. तसेच एलबीटीविरोधात आरपारची लढार्इ पुकारल्याचे स्पष्ट करीत येत्या ७ जून रोजी सर्व २५ महापालिकांच्या व्यापारी व उद्योजक प्रतिनिधींची बैठक नवी मुंबर्इत आयोजित करण्यात आल्याचेही न

Leave a Comment