विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन- आनंद

anand

पुणे- आगामी काळात होत असलेल्या बुद्धिबळाच्याय विश्‍वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन असे मत भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केले.आगामी काळात या स्पर्धेत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज असल्याचे भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने स्पष्ट केले.

विश्वनाथन आनंद पुणे येथ आयोजीत करण्यात आलेल्याक दुस-या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगचे उद्घाटन शुक्रवारी आनंदच्या हस्ते करण्याेत येणार आहे. आनंद याने पुण्यातील शालेय खेळाडूंबरोबरही संवाद साधला.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आनंद म्हणाला, आव्हानवीर स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे.कार्लसनविरुद्ध पराभवाची परतफेड करण्यासाठी नव्हे, तर आनंद याची कारकीर्द संपली आहे अशी टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी मी खेळणार आहे.या लढतीसाठी मी नियोजनबद्ध सराव करणार आहे.

ही लढत नॉर्वेत होणार आहे हे सध्या तरी निश्चित झाले आहे. ही लढत कोठेही झाली तरी माझ्या तयारीवर किंवा मनोधैर्यावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. टांझानिया, मोरोक्को व दुबई येथील स्पर्धामध्ये मी सहभागी होणार आहे.काही प्रदर्शनीय सामनेही मी खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये जीनिव्हा येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी सहभागी होईन असेही आनंदने यावेळी स्पनष्टा केले.

Leave a Comment