बहुगुणी बदाम

badam
बदाम हा सुका मेवा बराच लोकप्रिय आहे. त्याच्या बिया खाल्ल्या जातात. मात्र त्यांच्यावर कठीण आवरण असते. ते फोडल्यासच बदाम खाऊ शकतो. मात्र बाजारात बदामाचे बीसुध्दा उपलब्ध असते आणि ते महाग असले तरी वैद्यकीयदृष्ट्या बहुगुणी असते. बदाम १२ महिने उपलब्ध असते हासुध्दा त्यांचा एक गुणच आहे. बदामाचे खालील उपयोग प्रामुख्याने दिसून आले आहे.

१. बदामामध्ये कर्बोदके खूप असतात. त्यामुळे वजन घटवणे आणि वाढवणे या दोन्हीसाठी तो उपयोगी असतो. एकंदरीत बदाम वजन नियंत्रणात ठेवतो.

२. बदामामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यााठी बदाम कामी येते.

३. बदामामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. जेनकीन्स् डी. जे. या संस्थेमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगानंतर हा दावा करण्यात आलेला आहे.

४. बदामात फायबरचे म्हणजे तंतूमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बदाम खाल्ल्याने पोट साफ होते एकंदरीत कॅन्सर प्रतिबंधक आहे.

५. बदामामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. शिवाय जाडी कमी करण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतो.

६ बदामातील ई-जीवनसत्वामुळे बदाम खाणार्‍याची कातडी चमकते. बदामामुळे कर्करोग कमी होतो. इ. अनेक फायदे बदामामुळे होत असतात.