ट्वीटरवर गाजतेय हिडन कॅश अकौंट

hiddencash
सॅन फ्रान्सिस्को मध्ये सध्या अॅट द रेट हिडन कॅश अकौंट या रोख रक्कम मिळवून देणार्‍या अकौंटने एकच धमाल उडविली असून एक आठवड्याच्या आत ९७ हजार युजरनी हे अकौंट फॉलो केले आहे. दिवसेनदिवस याचे फॉलोअर वाढतच चालले असल्याचे अकौंट चालविणार्‍या अज्ञात व्यक्तीचे म्हणणे आहे.

हे अकौंट चालविणारी अज्ञात व्यक्ती एक क्ल्यू देते. त्यावरून सांगितलेल्या ठिकाणी पोहोचणार्‍यास रोख रक्कम मिळते. आत्तापर्यंत या प्रकारे ५ हजार डॉलर्स वाटले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे अकौंट चालविणारी व्यक्ती रिअल इस्टेट व्यवसायातील आहे आणि तिने या व्यवसायात खूप पैसा मिळविला आहे. हा पैसा वाटून लोकांच्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद त्यांना मिळवायचा आहे. ही लॉटरी नाही असा खुलासाही अकौंटधारकाने केला आहे.

आत्तापर्यंत क्ल्यू दिलेल्या जागा सॅनफ्रान्सिको सिलीकॉन व्हॅली, गोल्डन गेट ब्रिज , सॅन जोस परिसरातील आहेत असेही समजते. तेथे जाऊन पोहोचलेल्या लोकांना रोख रक्कम हिडन कॅश म्हणून दिली गेली आहे.

Leave a Comment