‘पडझड’ रोखण्यासाठी आव्हाड मंत्रिमंडळात

awhad_2
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली आहे. कॉंग्रेस पेक्षा जादा जागा लोकसभा निवडणुकीत मिळविल्या असल्या तरी विधानसभेचे ‘गणित’ पक्के करण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच आता लक्ष घातले आहे. ठाणे मतदारसंघात पडझड होऊ नये यासाठी मंत्रीमंडळात आमदार जितेंद्र आव्हाड यांना स्थान दिले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांनी भाजपची वाट पकडल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे गावित यांच्याकडे असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद रिक्त झाले होते. त्या जागेवर आव्हाड यांची वर्णी पक्षाने लावली आहे.राज्यपाल के. शंकरनारायण यांनी आव्हाड यांना सकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.तर मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीकडून शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना दिलासा देण्यात आला आहे. खान यांना हटविण्याची मागणी पक्षातून करण्यात येत होती,तसेच त्यांच्या जागेवर गावित यांचे बंधू शरद गावित यांची वर्णी लावून विजयराव गावित यांना शह देण्याचे समीकरण मांडण्यात येत होते मात्र पक्षश्रेष्टीनी खान यांना तूर्त हटवायचे नाही असा निर्णय घेतला.

Leave a Comment