गौतम गंभीरची इंग्लंड दौ-यासाठी निवड

gautam

मुंबई : टीम इंडिया ५५ वर्षानंतर प्रथमच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौ-यावर जात आहे. दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रातींनंतर प्रथम दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीरची टीम इंडियामध्ये निवड करण्या्त आली आहे. धोनीच्या नेतत्वाखालील या संघात गंभीरला स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय टीम इंडियाच्या संघात १८ खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

या दौ-यासाठी टीम इंडियामध्ये सात तेज मध्यमगती गोलंदाजांचा ताफा धोनीकडे सोपवण्यात आला असून अश्विन, जडेजा ही धोनीची मनपसंत जोडगोळी इंग्लंडच्या प्रदीर्घ दौ-यात भारतीय फिरकीचा भार वाहील. ९ ते १३ जुलैदरम्यान ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होईल. लॉर्ड्स, हॅम्पशायर कौंटीतील साऊदॅम्पटन येथील रोझ बॉल, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर आणि ओव्हल येथे पाच कसोटी जुलै, ऑगस्ट दरम्यान खेळवल्या जातील. ओव्हलचा अपवाद सर्वत्र तेज गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या असतील.

याआधी २००२ मध्ये तब्बल एका तपाआधी सौरव गांगुलीचा भारतीय संघ कॅरेबियन बेटांच्या दौऱ्यात विंडीजविरूध्द पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळला होता अन कार्ल हूपरच्या संघाने या मालिकेत २-१ अशी सरशी साधली होती. ईसीबीने बीसीसीआयच्या गळी पाच कसोटी सामन्यांची मालिका उतरवली हीच नवलाईची बाब. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ब्रिस्टल, कार्डिफ, नॉटिंगहॅमशायर, एजबॅस्टन, हेडिंग्ली लीडस येथे पाच वनडे तसेच वॉरिकशायर कौंटीतील बर्मिंगहॅम येथे टी-२० क्रिकेटचा सामनादेखील इंग्लंडच्या या प्रदीर्घ दौऱ्यात भारतीय संघ खेळणार आहे. शिवाय दौऱ्याच्या सुरूवातीला दोन सराव सामन्यांचे आयोजनही करण्यात आले आहे.

Leave a Comment