कोलकत्ता आयपीएलच्या अंतिम सामन्यात

kkr

कोलकत्ताध- आयपीएल स्पसर्धेच्या पहिल्या क्वालिफाईंगमध्ये कोलकात्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा २८ रन्सने दणदणीत पराभव केला आहे. आयपीएलच्या सातव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कोलकत्ता संघाची गाठ आता फायनलमध्‍ये पंजाब व चेन्न्ईतील विजेत्या संघाशी होणार आहे.

या सामन्यानत नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकात्याने पंजाबसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हा्न उभे केले होते. कोलकात्यातर्फे रॉबीन उत्थप्पाने दमदार फलंदाजी करताना ५२ रन्स केले. पण इतर एकही बॅट्समन मोठा स्कोर करू शकला नाही. पंजाबतर्फे करणवीर सिंगनं तीन तर अक्शर पटेल आणि मिचेल जॉन्सननं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

कोलकत्तकयाच्या १६४ धावांचा पाठलाग करणा पंजाबची सुरुवात खराब झाली. नमन वोहरा आणि वृद्धिमान सहानं सुरुवात तर चांगली केली. पण ते आऊट झाल्यानंतर ठराविक अंतरानं त्यांच्या विकेट जात राहिल्या. कॅप्टन बेलीने तळाला येऊन २६ रन्सची फटकेबाजी केली खरी पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही.कोलकात्यातर्फे उमेश यादवने तीन तर मॉर्नी मॉर्केलने दोन विकेट घेतल्या. या मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवत कोलकात्याने थेट फायनलमध्ये धडक दिली. तर पंजाबला अजूनही एक संधी बाकी आहे. दुसर्याय क्वालिफाईंगमध्ये त्यांनी विजय मिळवला तर त्यांनाही स्पर्धेची फायनल गाठता येणार आहे.

Leave a Comment