सचिनवर चौथीच्या पुस्तकात धडा

sachin

मुंबई- भारतरत्ना प्राप्त्ज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याीवरील धडा अभ्याासक्रमात समाविष्टव करण्याषत आला आहे. त्यातमुळे आता आगामी काळात विदयार्थ्यांंना शिक्षण घेत असतानाच सचिनच्या् काराकिर्दीची माहिती होणार आहे. राज्यासतील पाठयपुस्‍तक मंडळाना सचिन वरील धडा इयत्ता चौथीच्या‍ अभ्यािसक्रमात सहभागी केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणा-या व सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणा-या सचिनला आपले आई, वडील, कुटुंबीय, गुरूजन यांच्याविषयी किती आदर आहे, हे या धड्यात मांडण्यात आलं आहे. यामुळे हा धडा कोलाज या मूळ विषयावर असला, तरी सचिन हा विषय हा धड्यात प्रभावीपणे दिसून येतो.

या धडयात `माझा आवडता क्रिकेटपटू` या नावाखाली कोलाज कसं करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे. मात्र यामुळे चौथीच्या मुलांना आपल्या आवडत्या सचिनची आणखी माहिती होणार आहे. कारण यामध्ये सचिनची छायाचित्रे, शतके, अर्धशतके, धावसंख्या, पुरस्कार, तसेच सचिनच्या नावावरील जागतिक विक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment