गुंतवणुकीसाठी टाटा पॉवरची सार्क देशांवर नजर

tata
खासगी क्षेत्रातील दोन नंबरची वीज उत्पादन कंपनी टाटा पॉवरने देशाबाहेर साऊथ इस्ट आशिया तसचे सार्क देशात गुंतवणुकीचा निर्णय घेतला असून या देशात गुंतवणुकीच्या संधी किती आहेत याचा अभ्यास सुरू केला आहे. कांही देशांबरोबर या संदर्भात करारही करण्यात आले आहेत व तेथील प्रकल्पांची सुरवातही झाली असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सांगितले.

टाटा पॉवर महाराष्ट्रात पळसवाडी येथे सौर उर्जा तर शिवपुर येथे पवन उर्जा प्रकल्प उभारणीचे काम करत असून या दोन्ही प्रकल्पातून अनुक्रमे २५ व ५० मेगावॉट अपारंपारिक उर्जा २०१४-१२ मध्ये मिळणार आहे. याच बरोबर आफ्रिका, साऊथ इस्ट आशिया, मिडल इस्ट आणि सार्क देशातील प्रकल्पांसाठी बोलणी सुरू आहेत. सध्या आफ्रिका आणि भूतान येथील प्रकल्प बांधणीचे काम सुरू आहे.

जॉर्जिया तसेच अन्य देशात पवन, सौर आणि जल उर्जेचे प्रकल्प उभारले जाणार असून भूतान येथे १२६ मेगावॉटचा जल उर्जा तर जॉर्जियात ४०० मेगावॉटचा हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्प उभारला जात आहे. यात टाटाची भागीदारी ४० टक्के असून जॉर्जियातील प्रकल्पातून तुर्कस्तान आणि जॉर्जियाला वीज पुरविली जाणार आहे.

Leave a Comment