अखेर गीतेंनी पदभार स्वीकारला,पण सेनेची नाराजी कशी काय दूर?

gite
मुंबई – युतीत गेल्या अनेक वर्षापासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी दूर करण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या पण खातेवाटपाचा मुद्दा उकरून पदभार न स्वीकारणाऱ्या अनंत गीते यांनी आता अवजड उद्योगाचा पदभार स्वीकारला आहे,खुद्द सेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कैफियत मांडल्याने आता तोडगा काढण्यात आला आहे.

लोकसभेवर महाराष्ट्रातून १८ खासदार पाठवूनही अवजड उद्योगासारेख दुय्यम दर्जाचे खाते वाटयाला आल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने अखेर पदभार स्वीकारून एकमेव मंत्रिपद स्वीकारले आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील अन्य पक्षांना कमी जागा जिंकूनही महत्वाचे खाते आणि शिवसेनेला १८ जागा जिंकूनही कमी महत्वाचे खाते देण्यात आल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थतता होती त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे अस्वस्थ झालेल्या सेनेने डरकाळी फोडली खरी पण सत्तेच्या सारीपाटात सिंह असलेल्या मोदी सरकारपुढे ती काही टिकली नाही. आधी नकार देणाऱ्या सेनेने नंतर मात्र अपरिहार्येतून ‘होकार ‘देत ,मोदींच्या कणखर नेतृत्वाचा आधार घेत पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करून स्वतःची इभ्रत वाचविली मात्र आता अवजड उद्योगसारखे किरकोळ खाते देऊन बोळवण केल्याचा आक्षेप अप्रत्यक्ष घेतला. परिणामी सेना असमाधानी असल्याचे स्पष्ट झाले शिवाय युतीत महत्व मिळत नसल्याचा नवा मुद्दाही चव्हाट्यावर आल्याने युतीत दरार अशी चिन्हे दिसू लागली. शपथविधीनंतर दुस-याच दिवशी मंगळवारी सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला होता. मात्र अनंत गिते यांनी अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला नव्हता.मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनंत गिते यांनी बुधवारी अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला; पण फक्त एक मंत्रीपद वाटयाला आल्याने आदळआपट करणा-या शिवसेनेची नाराजी अचानक कशी काय दूर झाली ?हा नवा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.

Leave a Comment