अंतराळातून बगिच्यांवर लक्ष ठेवणारा उपग्रह

nasa
वॉशिग्टन – पृथ्वीच्या संरक्षणासाठी पर्यावरणाची जोपासना अत्यावश्यक ठरली असताना अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ऑरबिटींग कार्बन ऑब्झर्वेटरी २ हा उपग्रह लाँच करण्याची योजना आखली आहे. हा उपग्रह अंतराळातून पृथ्वीवरील झाडांवर लक्ष ठेवणार असून अगदी घरातील बागबगिच्यांवरही त्याची नजर राहणार आहे. हा उपग्रह पुढील महिन्यात लाँच केला जाणार आहे.

जगातील बागबगिचे, जंगले, रस्त्यावरील झाडे इतकेच नव्हे तर घराभोवती असलेली लॉन्सही त्याच्या नजरेतून सुटणार नाहीत. हा उपग्रह कार्बनचे स्त्रोत तसेच कार्बन सिंकचा वैश्विक नकाशा तयार करणार आहे. उपग्रहाने जमविलेल्या माहितीवरून वैज्ञानिक पृथ्वीवर निर्माण होत असलेला कार्बन आणि झाडे त्यातील किती कार्बन शोषून घेत आहेत याची अचूक माहिती मिळवू शकणार आहेत. प्रकाश संश्लेषणाचे विश्लेषण करून हा डेटा जमविला जाणार आहे.

पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण व्हावे व पर्यायाने आपली पृथ्वी सुरक्षित राहावी यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत हे समजून घेण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.

Leave a Comment