हेमकुंड साहिब ला यंदा खर्‍या फुलांची आरास

hemkundsahib
शिख समाजाचे गुरू हेमकुंड साहिब यांच्या हिमालायतील गुरूद्वारावर यंदा खर्‍या फुलांची सजावट केली गेली असून त्यासाठी हृषिकेश येथून ४० टन झेंडू आणि गुलाबाची फुले खेचरावरून यात्रास्थळावर नेण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयानंतर हेमकुंड साहिब यात्राही थांबविली गेली होती. यंदा यात्रेला प्रचंड संख्येने लोक येत आहेत. दरवर्षी या गुरूद्वारावर नकली फुलांची सजावट केली जाते मात्र यंदा खर्‍या फुलांची सजावट करण्याचा निर्णय गुरूद्वारा समितीने घेतल्याने ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. सजावटीसाठी नेण्यात येणारी फुले हा भाग दुर्गम असल्याने आणि आतपर्यंत वाहने नेता येत नसल्याने खेचरांच्या पाठीवरून नेण्यात आली आणि तेथील शीख भाविकांनी या फुलांच्या माळा तयार करून गेटपासून ते गुरूद्वारापर्यंत फुलांची नयनमनोहर सजावट केली असल्याचे समजते.

केवळ शिख समुदायाचेच नव्हे तर भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हेमकुंड साहिब गुरूद्वाराला भारताबरोबरच परदेशातून आलेले पर्यटकही आवर्जून भेट देतात. वर्षातून कांही दिवसच ही यात्रा भरते आणि त्यासाठी लाखो भाविक हा खडतर मार्ग पार करून गुरूद्वारात दर्शनासाठी येतात.

Leave a Comment