नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे सरकार परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत क्षेत्रनिहाय निर्णय घेईल पण मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी देणार नाही, असे भारताच्या पहिल्याच महिला व्यापार मंत्री निर्मल सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. त्या आपल्या खात्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाहीच
या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक येण्यासाठी देशातले लहान दुकानकार, व्यापारी आणि शेतकरी यांची एका विशिष्ट पातळीपर्यंत तयारी असावी लागते. ती झालेली नसल्याने या क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणूक मंजूर करता येत नाही, तशी ती केल्यास या घटकांचे नुकसान होईल असे सीतारामन म्हणाल्या.
किराणा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणूक करण्याचा निर्णय मनमोहनसिंग सरकारने घेतला होता आणि भाजपाने त्याला कसून विरोध केला होता. भाजपाची ती भूमिका अजूनही कायम आहे असे नव्या व्यापार मंत्र्यांनी म्हटले.