पूरग्रस्त सर्बियाला मोदी सरकारकडून मदतीची अपेक्षा

serbia
गेल्या कांही दिवसांपासून पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या सर्बियाने देशाच्या पुननिर्माणासाठी भारतात नव्याने स्थापन झालेल्या मोदी सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. सर्बियाचे भारतातील राजदूत जोवान मिरिलोविक यांनी ही माहिती दिली.

मिरिलोविम म्हणाले की सर्बियात तीन महिन्यात पडेल इतका मुसळधार पाऊस अवघ्या तीन दिवसांत पडला आहे. यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. १५ मे ते २३ मे पर्यंत देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. मुसळधार पावसाने देशापुढे मोठेच संकट निर्माण केले असून देशातील अनेक भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागांचे पुनर्निमाण करणे आवश्यक बनले आहे आणि त्यासाठी आम्हाला मोदी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. भारताच्या मदतीमुळे आम्ही या संकटातून बाहेर पडू शकू असा आम्हाला विश्वास वाटतो.

सर्बियाच्या अनेक भागात आजही पावसाचे पाणी भरलेले असून रस्ते,इमारती आणि अन्य मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment