सेमीफायनलमध्ये पंजाब-कोलकत्ता लढत

ipl

कोलकाता – आयपीएलच्या स्पर्धेत मंगळवारी होत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मंगळवारी पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे.या सामन्यात विजयी होणा संघ सरळ फायनलमध्ये जाणार आहे. तर पराजीत होणा-या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात पंजाबच्याा संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने हुकूमी एक्का या गवसला असून त्या ने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली आहेत. त्या‍मुळे या आयपीएलमधील या संघाची प्रतिमाही बदलली आहे. त्यादमुळे पंजाबला यावेळेस विजेता होण्याची संघी चालून आली आहे.

तर दुसरीकडे गौतम गंभीरच्या कोलकात्ता‍ संघाची गेल्याय काही सामन्यांपासून विजयी घौडदौड सुरु आहे. या संघाने सुरुवातीच्या सात सामन्यांमध्ये अवघे दोन सामने जिंकले होते. मात्र अखेर कोलकाता नाइट रायडर्सना सूर गवसला. या संघाच्या अंतिम लीग लढतीत तर सातत्याने अपयशी ठरणा-या युसूफ पठाणचीदेखील बॅट तळपली. युसूफने चक्क २२ चेंडूंमध्ये ७२ धावांची आतषबाजी केली.यामुळेच तर कोलकात्याचा नेटरनरेटदेखील सुधारला अन् त्यांनी याच्या आधारेच गुणतक्त्यात दुसरा क्रमांक पटकावला.

सलग सात सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या कोलकात्यासाठी आणखी एक फायद्याची बाब म्हणजे क्वालिफायरची ही लढत त्यांच्या घरच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला जाणकार भले बलाढ्य संघ म्हणत असतील; पण कोलकात्याचा सध्याचा झंझावात बघता जॉर्ज बेलीच्या पंजाबपुढे कडवे आव्हान असेल, असे वाटते.

Leave a Comment