फ्रेंच टेनिस स्प्र्धेत शारापोव्हाची विजयी सलामी

tennis

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत गत विजेत्या ठरलेल्या मारिया शारापोव्हाने दमदार खेळी सुरुच ठवली आहे. तिने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात केस्निया पेव्हॅक हीचा सरळ सेटमध्येल पराभव करीत विजय खेचून आणला आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळविता आल्याने आगामी काळात शारापोव्हाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात रशियाची सातवी मानांकित खेळाडू शारापोव्हा हिला केस्नियाविरुद्ध ६-१, ६-२ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. बारावी मानांकित फ्लेव्हिया पेनेट्टा या इटलीच्या खेळाडूने ऑस्ट्रियाच्या पॅट्रिसिया अॅाचलिटनेर हिला ६-२, ६-२ असे सहज हरविले.तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला.

लिसिकी या १६ व्या मानांकित खेळाडूला स्थानिक खेळाडू फिओना फेरो हिच्याविरुद्ध ६-१, ७-५ असा विजय मिळविताना थोडेसे झुंजावे लागले. दुस-या सेटमध्ये फिओना हिने कौतुकास्पद लढत दिली मात्र लिसिकी हिने अनुभवाच्या जोरावर हा सेट घेत सामना जिंकला. पुरुषांमध्ये स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझान याने निशिकोरी याच्यावर ७-६ (७-४), ६-१, ६-२ असा सनसनाटी विजय नोंदविला. त्याने केलेल्या वेगवान खेळापुढे निशिकोरी याचा बचाव निष्प्रभ ठरला. तसेच त्याने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. नेदरलँड्सच्या रॉबिन हास याने निकोलाय डेव्हिडेन्को याचे आव्हान ७-५, ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.

Leave a Comment