सत्तेसाठी सारे काही ‘… आठवले नाराज,शेट्टींचाही इशारा

athawale
मुंबई – नरेंद्र मोदी सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने आता नाराजीचा सूर आळवला जात असला तरी भाजपमधून सगळ्यांना कसे सामावून घेणार हा मुद्दा रेटला जात आहे,परिणामी महायुतीत ‘दरार’ पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर उपद्र्व्यमुल्य दाखवून दिले जाईल,असा इशारा दिला आहे. तर रिपाईचे रामदास आठवले हे तर प्रचंड नाराज झाले आहेत. परिणामी आगामी काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.

अनेक वर्षे कॉंग्रेसला साथ देणारे तसेच राष्ट्रवादीशी जवळीक असणारे रामदास आठवले यांना नंतर या दोन्ही पक्षांनी ‘कात्रजचा घाट ‘ दाखविल्याने सेना -भाजपच्या गोटात रिपाई गेली. तत्पूर्वी मागील विधानसभा निवडणुकीत ‘रिडालोस’ प्रयोग करूनही त्यात अपयश आल्याने आणि आघाडी सरकारने साथ सोडल्याने रिपाईने महायुतीत सहभाग घेतला,त्याचा फायदाही सेनाच काय भाजपला मतांच्या समीकरणात झाला पण आता आठवले यांचा डावलण्यात आल्याने त्याचे दूरगामी परिणाम महायुतीवर होणार आहेत.असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महायुतीतील आणखी एक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट मंत्रिपदावर दावा केलेला नाही. मात्र, घटक पक्षांच्या कौशल्याचा योग्य विचार व्हायला हवा होता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मला मंत्रिपदापेक्षा प्रश्नांमध्ये जास्त रस आहे. ते प्रश्न सुटले नाहीत तर योग्य वेळी माझे उपद्रवमूल्य दाखवून देईन, असा इशाराच त्यांनी दिला आहे.तर भाजपकडून एनडीएमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. सगळ्यांनाच मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण मंत्रिमंडळ छोटं आहे. त्यामुळे मर्यादा आहेत. जास्तीत जास्त घटक पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. पण सगळ्यांनाच संधी मिळेल असेही नाही,अशी भूमिका महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.