लतादिदींनी मोदींना लिहिले स्वहस्ताक्षरात पत्र

modi
मुंबई- स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मोदींना पंतप्रधान बनल्याबद्दल शुभेच्छा देणारे तसेच शपथविधी समारंभाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यकत करणारे पत्र स्वहस्ताक्षरात लिहिले असल्याचे समजते. मोदींनी या पत्राबद्दल दिदींना धन्यवाद देताना हे पत्र स्नॅपशॉटवर टाकले आहे.

लता दिदी लिहितात, आपण मला शपथविधीसाठी वैयक्तीक निमंत्रण दिले मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला प्रवास करता येत नाही. मराठी भाषेत लिहिलेल्या या पत्रात लतादिदींनी मोदींचे अभिनंदन करतानाच अनुपस्थितीबद्ल खेद व्यक्त केला आहे. लता दिदींनी मोदींना या शुभप्रसंगाची भेट म्हणून गणेशाची मूर्ती पाठविली असल्याचाही उल्लेख केला आहे.

मोदींनी या पत्राला उत्तर देताना लता दिदी, तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले आहे. तसेच शुभेच्छांबद्दल धन्यवादही दिले आहेत.

Leave a Comment