येरवडा जेलमध्ये पुन्हा कैद्याकडे मोबाईल

yerawada_0
पुण्याच्या मध्यवर्ती येरवडा कारागृहातील कैद्याकडे मोबाईल सापडण्याची घटना घडली असून गेल्या कांही दिवसांत कैद्याकडे मोबाईल सापडण्याचा हा तिसरा प्रकार आहे. यामुळे जेलमधील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेलमध्ये नेहमीच्या रूटीनप्रमाणे काल अचानक बराकींची तपासणी केली गेली तेव्हा नीलेश घायाळ गटातील एकाकडे सुरक्षा विभाग दोनमध्ये हा मोबाईल सापडला असल्याचे समजते.

दोन महिन्यांपूर्वीच अंडासेलमधील कैदी मुन्ना शेख याच्याकडे मोबाईल सापडला होता. त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल गेली होती मात्र अद्यापीही शेखला न्यायालयासमोर हजर केले गेलेले नाही. यापूर्वीही मोबाईल सीम कार्ड कैद्यांकडे सापडण्याच्या घटना घडल्या आहेत. जेलमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असतानाही हे प्रकार कसे घडतात असा जाब प्रशासनाला विचारला जात असून प्रशासनाच्या मदतीशिवाय असे प्रकार घडू शकत नाहीत अशीही टीका केली जात आहे.

Leave a Comment