पराभवातून अखेर भुजबळ सावरले

bhujbal
येवला – अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरले आहेत.पराभवानंतर प्रथमच प्रतिक्रिया देताना काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केले. ते म्हणाले ,काँग्रेसवर जनता मोठ्या प्रमाणात नाराज होती. त्याचा उत्तम फायदा मोदींनी करून घेतला, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भुजबळ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ,नाशिकमध्ये खूप कामे केली. याचा विचार लोकांनीही केला. त्यामुळेच गत निवडणुकीत समीरला सव्वादोन लाख मते मिळाली तर मला सव्वातीन लाख मते मिळाली. मात्र, यावेळी मनसेची मते शिवसेनेकडे वळाली. याशिवाय मोदी आणि मराठा समाजाची नाराजी या दोन लाटा माझ्याविरोधात होत्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसवर जनता मोठ्या प्रमाणात नाराज होती. या लाटेचा मोदींनी उत्तम फायदा करून घेतला. मात्र हे स्पष्ट करताना , मी काँग्रेसवर टीका करत नाही, तर त्यांचेच नेते असे बोलत असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment