गोलंदाजीतील डावपेच चुकले-द्रवीड

dravid2

मुंबई – आयपीएल स्पर्धेतील रविवारी झालेल्याल रोमहर्षक लढतीत मुंबईच्या अदित्य तरेने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवित राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव करीत आव्हान संपुष्टात आणले. यामुळे राजस्थान रॉयल्ससंघाचा मेंटॉर राहुल द्रविड नाराज झाला आहे.गोलंदाजीत आखलेले काही डावपेच चुकल्यायने पराभव स्वीयकारावा लागला असे मत राहुल द्रवीडने व्यक्त केले.

यावेळी बोलताना राहुल द्रवीड म्हाणाला, वानखेडेची खेळपट्टीवर मुंबईने छान फलंदाजी केली. १४.३ षटकात १९० धावांचा पाठलाग करणे सोपं नाही पण त्यांनी तर १४.३ षटकात १९५ धावा तडकावल्या. खेळपट्टी ठीक होती पण आम्ही नीट गोलंदाजी केली नाही आमचे आक्रमण भरकटले. मुंबईच्या बाजूने दोन षटकात खेळाचे पारडे फिरले. आदित्य तरेने जेम्स फॉल्कनरला षटकार खेचून मुंबईचा विजय साकारला तो १४.४ षटकात.कोरी अँडरसन तर भन्नाट खेळी खेळला. ४४ चेंडूत नाबाद ९५ धावा त्याने तडकावल्या.

आमच्या गोलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले असे सांगून द्रविड म्हनणाला १४.३ षटकात १८९ धावा झाल्यावर दोन्ही संघ गोंधळले. आम्हाला वाटलं की आम्हीच सामना जिंकला पण एका चेंडूवर विजयासाठी मुंबईला चौकाराची गरज होती याप्रसंगी खेळाडूंच्या भावना काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी. धावसंख्या समसमान झाली तेव्हा मुंबईचे खेळाडू निराश झाले होते तर आमचे खेळाडू जोशात होते पण एका चेंडूनंतर चित्र पालटले. हा अतिशय नाट्यपूर्ण सामना ठरला पण सामना गमावल्यामुळे माझी निराशा झाली.

१९ मे रोजीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहानेला दिलेल्या विश्रांतीच्या निर्णयाचे द्रविडने समर्थन केले. त्याला दुखापत झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली होती असे द्रविडने सांगितले.खेळाडू संपूर्ण फिट नसताना खेळवणे बरोबर नाही. त्या सामन्यात संघात तीन बदल आम्ही केले अन रविवारच्या सामन्यातही केले पण प्लेऑफची संधी हुकलीच.संजू सॅमसन आणि करूण नायर यांच्यार खेळाची द्रविडने तारीफ केली.

Leave a Comment