आपण खातोय ते अन्न ताजे, सुरक्षित आणि खाण्यायोग्य आहे का ते खाल्यामुळे अन्नविषबाधा होण्याची शक्यता आहे हे ओळखणारे इलेक्ट्रोनिक नाक संशोधकांनी तयार केले आहे. पेरेस नावाने हे उपकरण बनविले गेले आहे.
अन्नाचा ताजेपणा ओळखणारे इलेक्ट्रोनिक नाक
या उपकरणात चार सेन्सर बसविले गेले आहेत. त्याद्वारे बीफ, पोर्क, मासे, कोंबडी वा तत्सम पदार्थांपासून बनविलेल्या अन्नाचे तापमान, आर्द्रता, अमोनिया, अन्य घातक सेंद्रीय रसायने पदार्थात तयार झाली आहेत काय याची तपासणी केली जाते. त्यासाठी युजरने हे नाक फक्त त्या पदार्थांच्यावर धरायचे आहे. अन्नाची तपासणी करून त्याची माहिती हे उपकरण स्मार्टफोनवर ब्ल्यू टूथच्या माध्यमातून पोहोचविते आणि अन्न सुरक्षित आहे, खराब आहे, विषबाधा होण्याची शक्यता आहे वा कसे याच्या सूचना युजरला मिळतात.
अन्नाचा ताजेपणा, गुणवत्ता याबाबतही सूचना हे उपकरण देते. अन्नात तयार होऊ शकणार्या विविध प्रकारच्या १०० घातक रसायनांची तपासणी हे उपकरण करू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.