‘सत्तेच्या सारीपाटा’त शिवसेना भरकटली

shivsena_10
हिंगोली – सत्तेच्या सारीपाटात यंदा नरेंद्र मोदी यांच्यामुळे सत्तांतर झाल्याने प्रस्थापित पक्षांना हादरा बसला आहे तर भाजपचा मित्रपक्ष असल्याने शिवसेनेला मोठा फायदा झाला आहे;पण भाजपची विचारधारा आणि धोरणात्मक निर्णयामुळे सेनेची कोंडी झाली आहे शिवाय ‘सत्तेच्या सारीपाटा’त शिवसेना भरकटली या टीकेलाही सामोरे जावे लागत आहे.

सत्ता मिळत आहे असे पाहूनच शिवसेनेने भुमिका बदलली आहे. अशी तोफ काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दोन खासदारांपैकी एक असलेल्या हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी डागली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना कायमच विरोध केला आहे. तसेच पाकिस्तानी कलाकारांनाही त्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. असे असतांनाही आता नव्या शिवसेना पक्ष प्रमुखांना मात्र त्यांचे खासदार पाकिस्तानी पंतप्रधानांसमोर मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे कसे चालत आहे. असा सवाल सातव यांनी उपस्थित केला आहे.या अगोदर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही युतीवर टीका केलेली आहे. सातवांनी यावेळी भाजपचे सरकार सत्तेत येत असल्याचे पाहून शिवसेना पक्ष प्रमुखांनी बाळासाहेबांच्या विचारांना सोईस्करपणे डोळेझाक केल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसैनिकांनी वानखेडेची खेळपट्टी उकरण्याचे काम केले होते. या घटनेचीही सातवांनी यावेळी आठवण करून दिली आहे.

Leave a Comment