पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती

pune
पुणे – पुणे वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली असून हा नियम मोडणार्‍यांना दंड केला जाणार आहे. या नियमाची अम्मलबजावणी २५ मे पासून शहरात सुरू करण्यात आली आहे. शहरात दुचाकींच्या अपघाताची संख्या वाढत चालली असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे हे भारतातील सर्वाधिक दुचाकी असलेले शहर आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या दिवसेदिवस वाढतेच आहे व त्याचप्रमाणात अपघातांची संख्याही वाढते आहे.२००१ मध्ये प्रथम याच कारणासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. हेल्मेट न घालणार्‍यास १०० रूपये दंड केला जात होता मात्र वाहतूक शाखेच्या या निर्णयाला तेव्हापासूनच नागरिक, समाजसेवी संस्थांकडून विरोध केला जात होता आणि त्याविरोधात अनेक वेळा आंदोलनेही केली गेली आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने तर न्यायालयाला पुण्यातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालविणे कसे अशक्य आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कशी कमी आहे हे पटवून दिले होते त्यामुळे ही सक्ती कांही काळ थांबविली गेली होती.

Leave a Comment