अफगाणिस्तानला ओबामांची अचानक भेट

obama
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी सकाळी अफगाणिस्तानतील बाग्राम येथे असलेल्या अमेरिकी लष्कराच्या तळाला अचानक भेट दिली असल्याचे वृत्त आहे. चार तास ओबामा या स्थळी होते.

ओबामांची ही भेट अफगाणिस्तानात या तळावर असलेल्या अमेरिकन ट्रूपची भेट घेण्यासाठी होती असे सांगितले जात असून या वेळी त्यांनी २०१४ नंतर अजून किती काळ अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात राहणार याविषयी चर्चा केली तसेच हे युद्ध आता संपल्यात जमा असल्याने सैनिक मायदेशी परतू शकतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment