मोदी इफेक्ट – ६००० कोटी डॉलर्सची गुंतवणूक

modi3
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धाडसी पावले टाकतील या भरवशावर परदेशातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक झाले असून गेल्या दोन-तीन दिवसातच ६ हजार कोटी डॉलर्स (तीन लाख ६० हजार कोटी रुपये) गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. व्यापारी संघटनांच्या महामंडळाने ‘असोचेम’ने ही माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी २ हजार ९०० कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक भारतात झाली होती. त्या मानाने या वर्षी होत असलेली ही तिच्या दुप्पट गुंतवणूक उल्लेखनीय आहे. २०१२ साली त्यामानाने बरी म्हणजे ४ हजार ७०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. ती गुंतवणूक गेल्या काही वर्षातली उत्तम गुंतवणूक मानली गेली होती, पण आगामी वर्षभरात त्यापेक्षाही किती तरी अधिक गुंतवणूक होणार आहे.

ही गुंतवणूक कौतुकास्पद असली तरी तिच्यासाठी डॉलर्स-रुपया विनिमय दर आणि व्यापारी तोटा या स्तरावर रिझर्व्ह बँक आणि अर्थ खाते यांना बरीच तडजोड करावी लागणार आहे. या दोघांना जेवढा समन्वय चांगला असेल तेवढी ही गुंतवणूक सोगी होईल असे मानले जात आहे.

Leave a Comment