पोलिटिकल क्लास वाहन अॅंबी ची निर्मिती थांबली

ammbesedor
अँबी, ग्रँड ओल्ड लेडी या नावाने भारताच्या वाहन उद्योगात प्रसिद्ध असलेल्या आणि राजकारणी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची खास ओळख बनलेल्या अॅबॅसिडर गाड्यांचे उत्पादन हिंदुस्तान मोटर्सने अखेर पूर्णपणे थांबविले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कर्जाचा वाढत चाललेला बोजा, कंपनीतील बेशिस्त आणि गाडीला कमी झालेली मागणी यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तशी सूचना बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिली गेली आहे.

पोलिटिकल क्लास वाहन अशी ओळख निर्माण झालेली ही कार पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथील कारखान्यात तयार केली जात होती. हिदुंस्थान मोटर्स ही भारतातील सर्वात जुनी वाहन कंपनी आहे. ब्रिटनच्या मॉरिस ऑक्सफर्ड या कारच्या धर्तीवर अॅबेसिडर गाड्यांचे उत्पादन केले जात होते आणि गेल्या ६० वर्षांत फक्त एखदाच तिच्या डिझाईनमध्ये किंचित बदल केला गेला होता. १९५७ पासून या गाड्यांचे उत्पादन केले जात होते.

कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार मागणी नसल्याने तसेच कर्जाचा बोजा वाढत चालल्याने गाड्यांचे उत्पादन खूपच कमी झाले होते. १९८० सालात या गाड्यांना खूप मागणी होती आणि तेव्हा दिवसाला २४ हजार गाड्या तयार केल्या जात होत्या. आज हा आकडा केवळ पाचवर आला आहे. भारताच्या रस्त्यावरील सम्राज्ञी ठरलेल्या या कारला आधुनिक गाड्यांनी चांगलीच स्पर्धा निर्माण केली होती.

राजकारणी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची अँबेसिडर गाडी ही खास पसंती होती. ती त्यांची ओळखच बनली होती. याचमुळे दिल्लीत संसदेवर २००१ साली झालेल्या हल्यात याच गाडीचा वापर हल्लेखोरांनी करून संसद परिसरात प्रवेश मिळविला होता.टॅक्सीचालकांत मात्र आजही ही गाडी लोकप्रिय असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment