नवाझ शरीफ म्हणतात ,शांततेचा संदेश घेऊन भारतात !

sharif
लाहोर – पाकिस्तानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. मी नवी दिल्लीला शांततेचा संदेश घेऊन चाललो आहे असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात येण्यापूर्वी लाहोर विमानतळावर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळयासाठी भारतात दाखल झाले आहेत. हवाई दलाच्या पालम विमानतळावर शरीफ यांचे विमान उतरले. शरीफ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुलसूम नवाझ आणि मुलगा हुसेन नवाझ आले आहेत.नवाझ शरीफ पहिल्यांदाच भारत दौ-यावर आले आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणा-या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळयाला ते सहकुटुंब उपस्थित रहाणार आहेत.शरीफ आज दिल्लीतच मुक्काम करणार असून, उद्या सकळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत.

Leave a Comment