ताशी ४५ मैल वेगाने धावणारा रोबो

robot
फ्लोरिडा येथील रोबोटिक्स अनलिमिटेड या कंपनीने आऊट रनर नावाचा ताशी ४५ मैलांच्या वेगाने पळणारा ६ पायांचा रोबो तयार केला आहे. हा रोबो ट्रेडमिलवर ताशी ४५ मैलाच्या वेगाने धावू शकतो तर साध्या जमिनीवर तो ताशी २५ मैल वेगाने पळतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

कंपनीला आता आऊटरनर रोबोची छोटी प्रतिकृती तयार करावयाची असून हा रोबोही तासाला २० मैल धावू शकेल असा त्यांचा दावा आहे. हा रोबो तयार करण्यासाठी कंपनीने दीड लाख डॉलर्सचा निधी जमविण्यास सुरवात केली आहे. हा रोबो यशस्वीपणे बनविला गेला तर कंपनीने जागतिक पातळीवर या रोबोंच्या रोबो रेस घेण्याची तयारीही केली आहे आणि या स्पर्धेत कुणालाही भाग घेता येणार आहे.

कंपनीने तयार केलेला रोबो प्राण्यासारखा पळतो पण तो प्राण्यांसारखा दिसत मात्र नाही. तो गवत, जमीन, डोंगरउतार अशा कोणत्याही ठिकाणी धावू शकतो तसेच रनिंग ट्रॅकवरील वळणेही लिलया पार करू शकतो. सध्या हा रोबो सहा पायांचा असला तरी चार पायांचा रोबोही याच वेगाने पळू शकेल असा संशोधकांना विश्वास आहे.

Leave a Comment