जॅकलिन केनेडींनी लिहिलेल्या पत्रांचा लिलाव थांबविला

jackie
जगात सर्वाधिक प्रशंसा लाभलेल्या अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी यांनी आयर्लंड येथील पाद्रीना लिहिलेल्या पत्रांचा शेफर्ड आयरिश ऑक्शनतर्फे केला जात असलेला लिलाव थांबविला गेला असल्याचे समजते. लिलावासाठी ही पत्रे डब्लीन येथील ऑल हॅलोज कॉलेजमध्ये ठेवण्यात आली होती. हे कॉलेज कॅथलिक चर्च विसेंटियन चे पाद्री चालवितात. केनेडी कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर या लिलावाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे असे समजते.

धर्मगुरू रेव्हरंड जोसेफ लियोनार्ड यांना जॅकलिन यांनी ही पत्रे १४ वर्षांच्या कालावधीत लिहिली होती. ही पत्रे अतिशय भावपूर्ण आहेत. त्यातून जॅकलिनच्या वैयक्तीक विचारांची झलक दिसते. प्रेमाबद्दलची तिची भावना, पती जॉन केनेडी यांचे परस्त्रियांबरोबरचे प्रेमसंबंध आणि नोव्हेंबर १९६३ मध्ये केनेडीची हत्या झाल्यानंतर जॅनलीनला करावा लागलेला संघर्ष याविषयी ही पत्रे आहेत.

जॅनलिन केनेडी यांचा मृत्यू १९९४ साली झाला मात्र तोपर्यंत जगात सर्वाधिक चर्चेत असलेली महिला म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.

Leave a Comment