मुंबई – नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे देशात सत्तांतर झाले आहे.अगदी त्यांच्या धर्तीवर ‘स्टाईल’चे नवे राजकारण सुरु झाले आहे, अगदी राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यापर्यंतची ‘नक्कल ‘ रेटण्याची खेळी सुरु असताना मोदींनी संसदेत ढोकळा या पदार्थाचा समावेश भोजनात केला नाही तोच उद्धव ठाकरेंना वडापावची आठवण झाली आहे,त्याजोडीला थालीपीठ ,मिसळपावही संसदेत मिळायला हवा आणि खासदारांनी त्यासाठी जोर लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, त्यांचे वक्तव्य टीकेला कारणीभूत ठरणार असले तरी उद्धव ठाकरेंना ‘झुणका भाकर’चा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरेंना झुणका -भाकरीचाही विसर ;सेनेचे खासदार ‘खाण्या’पुरते?
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’तून उद्धव ठाकरे यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी देशापुढे गुजरातचे मॉडेल ठेवले व ते देशाने स्वीकारले असे उद्धव यांनी म्हटले आहे. मोदींच्या गुजरातप्रेमाचे कौतुक करतानाच दिल्लीत गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रालाही स्थान मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, मोदी यांनी गुजरातला ‘आवजो’ म्हटले व देशाचे ‘बडाप्रधान’ होण्यासाठी दिल्लीस निघाले तेव्हा मोदी यांनी भावपूर्ण भाषण केले. यापुढे पंतप्रधान कार्यालयात गुजराती बोलले जाईल व तेथे ढोकळा, गाठिया मिळेल’असे मोदींनी सांगितले. मोदी यांनी हे अभिमानाने सांगितले व त्याविषयी कुणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. ढोकळा व गाठिया महाराष्ट्रातही आवडीने खाल्ले जातात. पण ढोकळा, फाफडा, कचोरीबरोबर मिसळपाव, वडापाव असेल तर लज्जत चांगलीच वाढेल. निदान संसदेच्या मध्यवर्ती कार्यालयात खमंग वडापाव, थालीपीठ, मिसळपाव असे पदार्थ मिळावेत यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी जोर लावला पाहिजे.असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे;पण राज्यात युतीचे सरकार असताना झुणका भाकर योजना सुरु करणाऱ्या सेनेला हि योजना का गुंडाळली गेली याचा आजपर्यंत पत्ता लागला नाही ,अगदीच काय झुणका भाकरीचाही विसर पडल्याचे या मागणीमुळे स्पष्ट झाले आहे.