‘आप’च्या कार्यकर्त्यांना सावरा हो …

medhapatkar_0_0
मुंबई – ‘आप’च्या कार्यकर्त्यांना आता सावरा हो असा ‘टाहो’ मेधाताई पाटकर यांनी फोडला आहे;पण त्यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या ‘जेल बंदिस्त’ भूमिकेबद्दल नाराजीही दर्शवली आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याचे मनोबल लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचले असताना त्याबाबत चिंतन करायचे सोडून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे तुरुंगात जाऊन बसले असल्याबद्दल मेधा पाटकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘आप’च्या कार्यकर्त्याला वेळीच सावरले नाही तर पक्षाची हानी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडणुकीत जो पराभव झाला त्याबद्दल दुःख वाटणे स्वाभाविक आहे. पराभवाने पक्षाला हादरा बसला आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चिंतन बैठका आयोजित केल्या पाहिजेत.अशी भूमिका पाटकर यांनी यावेळी मांडली.

Leave a Comment