रिलायन्सही ईकॉमर्स बाजारात येणार

reliance
भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ईकॉमर्सची मोहिनी रिलायन्स उद्योगसमुहाला पडली आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी रिलायन्स रिटेल या वर्षीच भारताच्या ईकॉमर्स बाजारपेठेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले असून तशी माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यासाठी नवीन शहरांवर रिलायन्स अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. येत्या कांही वर्षात मल्टी चॅनल शॉपिंगही कंपनी सुरू करत आहे. रिलायन्सची सध्याची रिटेल स्टोअर्स आहेत तेथेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जोडता येईल का याची चाचपणी केली जात आहे असेही समजते. यामुळे रास्त दरात ग्राहकांना माल मिळणार आहे. कंपनीच्या पाच महत्त्वाच्या क्षेत्रांवर अधिक लक्ष पुरविले जात असून त्यात व्हॅल्यू मार्ट, फॅशन, लाइफस्टाईल, डिजिटल आणि ज्वेलरी ब्रांडचा समावेश आहे. रिलायन्सच्या रिटेल व्यवसायात ३४ टक्के वाढ झाली आहे मात्र त्यांच्याकडे अजून ऑनलाईन शॉपिंग सुविधा नसल्याने ई कामर्स मध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला गेला आहे. कंपनीची देशात १४६ शहरात १६९१ रिटेल स्टो्अर्स आहेत.

रिसर्च फर्म फोरस्टरच्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये भारतात ई कॉमर्स व्यवसायाची उलाढाल १३ अब्ज रूपयांची झाली आहे. त्यात रिटेल ऑनलाईन विक्री व्यवसायाचा वाटा १.३ अब्ज रूपयांचा आहे . २०२१ सालापर्यंत ही उलाढाल ७६ अब्ज रूपयांवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment