थायलंड माजी पंतप्रधान शिनवाग नजरकैदेत

thailand
बँकॉक – थायलंडमध्ये लष्कराने सत्ता हातात घेतल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर दुसर्‍याच दिवशी पदच्यूत पंतप्रधान थिगलुक शिनवाग यांना नजरकै देत टाकण्यात आले आहे. शिनवान यांना प्रथम लष्कराच्या एका तळावर कांही तास ठेवल्यानंतर अज्ञातस्थळी नेले गेले असल्याचे समजते. त्यांच्या कार्यकाळातील अनेक नेत्यांना लष्कराला रिपोर्ट करण्याचे आदेशही स्वघोषित पंतप्रधान लष्करप्रमुख जनरल प्रायुथ चान ओचा यांनी दिले आहेत.

देशातील तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुरूवारी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान व त्यांचे मंत्रीमंडळ बरखास्त करून सत्ता हाती घेतली आहे. १९३२ साली थायलंडमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर येथे झालेले हे १२ वे सत्तांतर आहे. नवीन पंतप्रधानांनी पूर्वीच्या मंत्रीमंडळातील नेते आणि अन्य राजकीय नेते असे १५५ जणांना देश सोडून बाहेर जाता येणार नसल्याचे निर्बंध लागू केले असल्याचेही समजते.

Leave a Comment