चिंतन बैठक;कॉंग्रेसमध्येच ‘फाळणी’ !

congress
मुंबई -लोकसभा निवडणुकीत ‘होत्याचं नव्हतं ‘झाल्याने कॉंग्रेसच्या गोटात ‘ सुतकी’ वातावरण आहे,मतदारांनी नापास केल्याचा शिक्का ‘प्रगतीपुस्तका’वर बसल्याने चिंतन बैठकीत एकमेकांवर खापर फोडण्याचे राजकारण होऊ नये म्हणून तुमचे कार्यक्षेत्र पहा ,आमच्यात डोकावू नका ,असा पवित्रा घेवून कॉंग्रेसच्या चिंतन बैठकीवर मुंबई कॉंग्रेसने ‘बहिष्कार’घालून ‘फाळणी’चे राजकारण सुरु केले आहे. मुंबईतील टीळक भवनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसकडून पराभव चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहण्यास मुंबई काँग्रेसच्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱयांनी नकार देत बैठकीकडे पाठ फिरवली.

वास्तविक त्याला कॉंग्रेसची पक्षांतर्गत रचनाच कारणीभूत ठरली आहे. मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस असे दोन स्वतंत्र विभाग काँग्रेसकडून राज्यात करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मुंबईतील पराभवावर चिंतन बैठक घेण्याचा अधिकार नसल्याचे मुंबई काँग्रेस पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे. तसेच गैरहरजर राहील्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस पूर्णपणे वेगळी असल्याचे कारण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी दिले आहे . त्यामुळे नवा वाद चव्हाट्यावर आला असला तरी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था नेत्यांची झाली आहे.

Leave a Comment